Bhandup Hospital fire: ड्रिम्स मॉल आणि सनराईजच्या संचालकांवर गुन्हा दाखल

surise.jpg
surise.jpg

भांडुपचा ड्रीम्स मॉल आणि सनराईज रुग्णालय अग्नि दुर्घटना प्रकरणात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ड्रिम्स मॉलचे संचालक आणि सनराईज हॉस्पिटलच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राकेशकुमार वाधवान, निकीता त्रेहान, सारंग वाधवान, दिपक शिर्के या ड्रिम्ल मॉल्सच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तसेच सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंह त्रेहान, निकीता अमितसिंग आणि स्विटी जैन यांना आरोपी बनवण्यात आले आहे. 

कलम ३०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. या मॉलमध्ये ११०८ गाळे असून ४० टक्के गाळे सुरु आहेत. जानेवारी २०२१ पासून सनराईज हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून कार्यरत आहे. मॉल आणि हॉस्पिटलने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचे भांडूप पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

ड्रिम्स मॉलमध्ये काय घडलं?
काल भांडूप येथील ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला भीषण आग लागली होती. या आगीत ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व कोविड रुग्ण होते.  या मॉलमध्ये सनराईज हे कोविड रुग्णालय आहे. सुरुवातीला या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. अखेर दुपारी ही आग नियंत्रणात आली. या हॉस्पिटलमध्ये ७८ रुग्ण उपचार घेत होते. सनराईज हॉस्पिटलला एक ऑक्टोबरपासून नर्सिग होम चालवण्याचा परवाना मिळाला होता. जानेवारी २०२१ पासून हे हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून कार्यरत होते. 

(संपादन - दीनानाथ परब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com