esakal | भांडूपमध्ये भिंत कोसळून सोहमचा दुर्देवी मृत्यू, घार पक्षाला जीवदान!
sakal

बोलून बातमी शोधा

Bird life safe

भांडूपमध्ये भिंत कोसळून सोहमचा दुर्देवी मृत्यू, घार पक्षाला जीवदान!

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून सोहम थोरात (Soham Thorat) या 16 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला. याच घटनेत झाडावरून कोसळलेल्या घारीच्या पंखाला आणि डोळ्याला जखम झाली. त्याच वेळी स्थानिकांनी अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई (पीएडब्ल्यूएस-मुंबई) यांच्याशी संपर्क केल्याने घारीचा जीव वाचू शकला. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) भांडुप पश्चिमेला (Bhandup West) अमर कोर विद्यालयाजवळ भिंत कोसळून (Wall Collpes) झालेल्या अपघातात सोहम थोरात या 16 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला. भिंतीच्या शेजारी असलेल्या झाडावरून भिजलेल्या अवस्थेतील घार खाली कोसळली. भिंतीच्या दगडांमुळे तिच्या पंखांना आणि डोळ्यांना जखमा झाल्या. त्यामुळे ही घार निपचित पडून होती. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात एसीएफ पीएडब्ल्यूएस-मुंबईला माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे स्वयंसेवक प्रथमेश उघाडे (Prathamesh Ughade) यांनी घटनास्थळी जाऊन जखमी घराला बाहेर काढले. प्रथमोपचार केल्यानंतर घारीला पशुवैद्यकिय डॉ. राहुल मेश्राम (Dr Rahul Meshram) यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. ( Bhandup Land Collapse tragedy one death but bird alive- nss91)

loading image