Tue, May 30, 2023

भांडूपच्या जंगलात सापडले नवजात अर्भक
Published on : 30 September 2021, 10:40 am
घाटकोपर : भांडुप पश्चिमेत (bhandup west) पवई आयआयटी (powai IIT) मार्केटशेजारी महात्मा फुले नगरलगत असणाऱ्या एका झुडपात एक स्त्री जातीचे नवजात अर्भक (Infant) फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास या भागातून जाणाऱ्या अनिकेत मगर (२०) या तरुणाच्या ही बाब लक्षात आली.
त्याने लगेच स्थानिकांसह पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नगरासेविका जागृती पाटील यांनी या अर्भकाची रवानगी महात्मा फुले प्रसूतिगृहात केली असून, तेथे उपचार सुरू आहेत. या मुलीची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पार्कसाईड पोलिस पालकांचा शोध घेत आहेत.