Bharat Bandh Updates: शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत जागोजागी आंदोलन

Bharat Bandh Updates: शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत जागोजागी आंदोलन

मुंबईः आज देशभर सुरू असलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा देत आज निदर्शने करण्यात येत आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

घाटकोपरमध्ये रास्ता रोको, काँग्रेस कार्यकर्ते- पोलिसांत बाचाबाची 

मुंबईतल्या उपनगरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्लामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आज ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. घाटकोपरमध्ये सर्वोदय सिग्नल या मुख्य रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यानी एलबीएस मार्गवर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष केतन शहा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यानी फलक बाजी करत केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. एलबीएस मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही मिनिटांसाठी रास्ता करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आनंद शुक्ला, ब्रिजेश शर्मा, जावेद आमीन आदी उपस्थित होते. 

लालबागमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कायद्यात केलेल्या बदलाविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला  भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दर्शवला. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष मुंबई कौन्सिलचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिरामणी मार्केट लालबाग येथे निदर्शने करण्यात आली.  'खाजगीकरण थांबलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळला पाहिजे, शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो' अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या. 

यावेळी कॉ. प्रकाश सावंत, कॉ. गोविंद पाटकर आदी नेते मंडळी, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता काळाचौकी पोलिस ठाण्यातर्फे येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वात मालवणीमध्ये रॅली आणि मालाडमध्ये निदर्शने
 
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद' ला  समर्थन देण्यासाठी काँग्रेससह कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरलं.
आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह सीपीएम, सीपीआई, राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मालाड रेल्वे स्थानक आणि मालवणी येथे तीव्र निदर्शने केली. 

शेतकरी जगला तरच देश जगेल. या लढाईत शेतकरी एकटा नाही.काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरुन दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हाच संदेश दिला आहे. तसेच मालवणी प्रवेशद्वार क्रमांक 7 येथे रॅली मधून मंत्री अस्लम शेख मालाड जाण्यासाठी निघाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर काही वेळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आंदोलक यांनी रस्ता जाम केल्यावर त्यानंतर पोलिसांना पुढे जाण्यास दिले. 

मालवणी क्रमांक 1 येथे काही वेळ आंदोलकांनी निदर्शने करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक विरेंद्र चौधरी, वरिष्ठ कॉम्रेड ऐसी श्रीधरन, अब्राहम थॉमस रईस शेख, मुश्ताक मेस्त्री, सद्दाम शेख यांनी आपले मत व्यक्त करत सरकारच्या कृषि धोरणाचा निषेध आम्ही अन्नदात्या बळीराजासोबत आहोत, असे मत व्यक्त केले.

चेंबूर, पंजरापोल आणि चेंबूर नाका येथे  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या  कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.  भारत बंद ला महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा दिला असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. त्यामुळे पनवेल सायन मार्गावरील वाहतूक कित्येक तास ठप्प होती. पोलिसांनी मध्यस्थी घेऊन आंदोलकांना बाजूला केले.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bharat Band Updates Various place protest Mumbai support of farmers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com