कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक

भारत बायोटेक ही स्वदेशी लस मुंबईकरांना कधी उपलब्ध होईल असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 23 : भारत बायोटेक ही स्वदेशी लस मुंबईकरांना कधी उपलब्ध होईल असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. मात्र, ही लस येण्याआधी त्याबाबत उत्सुक असलेल्यांनी पालिकेच्या सायन रुग्णालयाशी संपर्क करुन विचारणा केली आहे. आतापर्यंत 300 मुंबईकरांनी कोरोनाची देशी लस भारत बायोटेक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'कोव्हॅक्सिन' या चाचणीसाठी मुंबईतील पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, चाचणी सुरू करण्यासाठी फक्त एथिकल समितीकडून परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षा आहे. 

कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईत अनेक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. एकीकडे ऑक्सफर्डच्या परदेशी लसीच्या चाचण्या पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये सुरू आहेत. दुसरीकडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या मदतीने विकसित केलेल्या देशी लसींच्या चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन रुग्णालयाची निवड केली आहे. 

महत्त्वाची बातमी : नरिमन पॉईंटला मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांनी घेतला 5.3 कोटींचा फ्लॅट

सायन रुग्णालयात लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार आहे. सायन रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, ही 3-फेज चाचणी असल्याने आम्हाला 1000 हून अधिक स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घ्यावी लागेल. आतापर्यंत 300 लोक लस घेण्यास उत्सुक आहेत. आम्हाला आशा आहे की या आठवड्यात आम्हाला एथिकल कमिटीकडून लसीची चाचणी सुरू करण्यास परवानगी मिळेल. आम्हाला खात्री आहे की आम्हाला 1000 हून अधिक स्वयंसेवक मिळतील. गरज भासल्यास वृत्तपत्रांतही जाहिरात दिली जाईल. 

यांना चाचणीत सामावून घेतले जाईल -

या चाचणीसाठी एकूण स्वयंसेवकांपैकी 20 टक्के अशा लोकांना घेतले जाईल ज्यांना आधीच हृदय, मूत्रपिंड, यकृताचा आणि इतर आजार आहेत. या चाचणीत 5 टक्के अग्रगण्य आरोग्य कर्मचारी देखील सहभागी होतील.

( संपादन - सुमित बागुल )

bharat biotech co vaccine three hundred volunteer interested in taking vaccine at mumbai

loading image
go to top