Bhayandar Crime : मारहाणीत चोराचा मृत्यू; चारजणांना अटक

चोरीसाठी आलेल्या अनोळखी इसमाला झालेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदर पूर्व येथे घडली आहे.
Bhayandar Crime
Bhayandar CrimeSakal

भाईंदर - चोरीसाठी आलेल्या अनोळखी इसमाला झालेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना भाईंदर पूर्व येथे घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. भाईंदर पूर्व येथील बी पी क्रॉस रोड येथे असलेल्या भाजी बाजारातील सार्वजनिक स्वच्छतागृहात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता.

इसमाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी आस्पासच्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळवले, त्याचप्रमाणे माहितीगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करुन पोलीसांनी चार आरोपींना अवघ्या सहा तासात अटक केली.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत एक अनोळखी इसम आरोपी रहात असलेल्या गाळ्यात रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याला आरोपींनी बेदम मारहाण करुन नंतर जवळच्या स्वच्छतागृहात टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक धिरज कोळी यांच्या पथकाने हा तपास केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com