भिवंडी इमारत दुर्घटनाः मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, पालकमंत्र्यांची घोषणा

राजेश मोरे/ शरद भसाळे
Monday, 21 September 2020

भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ही मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुंबईः भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ही मदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून 10 जण मृत्युमुखी पडले, तर किमान 30 ते 35 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री  शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे  शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील 102 धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही  शिंदे यांनी सांगितले.

भिवंडी इमारत अपडेट सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे.

हेदर सलमानी( पु/20वर्ष)
रुकसार खुरेशी(स्त्री/26 वर्ष)
मोहम्मद अली(पु/60 वर्ष)
शबीर खुरेशी(पु/30 वर्ष)
मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/45 वर्ष)
कैसर सिराज शेख (स्त्री/27 वर्ष)
रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ 25वर्ष)
अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/28 वर्ष)
आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/22 वर्ष)
जुलेखा अली शेख (स्त्री/52वर्ष)
उमेद जुबेर कुरेशी (पु/4वर्ष)
आमीर मुबिन शेख (पु/18 वर्ष)
आलम अन्सारी (पु/16वर्ष)
अब्दुला शेख(पु/8वर्ष)
मुस्कान शेख(स्री/17वर्ष)
नसरा शेख(स्त्री/17वर्ष)
इंब्राहिम(पु/55वर्ष)
खालिद खान(पु/40 वर्ष)
शबाना शेख(स्त्री/50वर्ष)

मृत व्यक्तीची नावे

झुबेर खुरेशी(पु/30 वर्ष)
फायजा खुरेशी(पु/5वर्ष)
आयशा खुरेशी(स्री/7वर्ष)
बब्बू(पु/27वर्ष)
फातमा जुबेर बबु (स्त्री/2वर्ष)
फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/8वर्ष)
उजेब जुबेर (पु/6 वर्ष)
असका आबिद अन्सारी (पु/14 वर्ष)
अन्सारी दानिश अलिद (पु/12वर्ष)
सिराज अहमद शेख (पु/28 वर्ष)

घटनास्थळी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याशी अनाधिकृत आणि धोकादायक इमारत बाबतीत चर्चा केली. तसेच शासकीय मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Bhiwandi building accident 5 lakh assistance families deceased Guardian Minister announces

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi building accident 5 lakh assistance families deceased Guardian Minister announces