भिवंडी इमारत दुर्घटनाः चिमुकल्याला जीवदान, पाहा अंगावर काटा येणारा व्हिडिओ

पूजा विचारे
Monday, 21 September 2020

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.  एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात यश आलं आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. 

मुंबईः भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात यश आलं आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतात तसंच या लहान मुलाच्या बाबतीत घडलं. NDRF च्या पथकानं या चिमुकल्याला रेस्क्यू करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील जिलानी तीन मजली इमारत कोसळली.  दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरू असल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी आहे.

Bhiwandi building accident NDRF saved Child life watch the video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi building accident NDRF saved Child life watch the video