भिवंडीत मनसेचे शहराध्यक्षसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; टोरंट पावर ग्राहक सेवा केंद्रात तोडफोड केल्याचे प्रकरण

भिवंडीत मनसेचे शहराध्यक्षसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; टोरंट पावर ग्राहक सेवा केंद्रात तोडफोड केल्याचे प्रकरण

भिवंडी  - भिवंडी शहरातील अंजुरफाटा ओसवाल वाडी  व आमपाडा येथील टोरंट पावर कंपनीच्या ग्राहक सेवा कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भिवंडी शहरातील शांतीनगर व नारपोली अशा दोन  विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

भिवंडी शहर परिसरात वीज पुरवठा व वीज बिलाची वसुली करणाऱ्या टोंरट पावर कंपनीने लॉक डाऊन काळामध्ये नागरिकांना जादा दराने वीज बील आली आहेत.अशी तक्रार करून विज बिलात माफी द्यावी अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल दुपारी शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमपाडा चाविंद्रा रोड येथील टोरंट पॉवर कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्र कार्यालयाच्या दरवाजाची काच व पार्टिशन सोडून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान केले व कामकाज बंद पडावे यासाठी सुरक्षा रक्षकांना दमदाटी केली त्यामुळे कंपनीचे अनिल सुर्वे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मनसेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रवीण देवकर यांच्यासह आठ ते दहा जणांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अंजुरफाटा ओसवाल वाडी येथे असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या ग्राहक सेवा कार्यालयाचे दरवाजाचे काचा फोडून 3 लाख रुपयांचे नुकसान केले त्यामुळे कंपनीचे कृष्णदेव गावडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यामुळे पोलिसांनी मनसे पदाधिकारी सुशील आवटे, मयूर जाधव यांच्यासह  दहा ते बारा मनसेच्या अनोळखी कार्यकर्त्यांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबतअदयाप कोणासही अटक नाही. अधिक तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत व पोलीस ठाण्याचे मालोजी शिंदे करीत आहे.

Bhiwandi case file against MSN activists Case of vandalism at Torrent Power customer service cente

-------------------------------------------

 संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com