Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास स्थानी भेट घेतली आहे. मनसेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला असून मनसेची मते या निवडणूकीत निर्णायक ठरु शकतात.

मनसेचा पाठिंबा जाहीर होताच भिवंडीत भाजपने प्रचार सभांतील बॅनर, फलक यांच्या माध्यमातून मनसेला मानाचे स्थान दिल्याचे यापूर्वी पहायला मिळाले आहे. मनसेची मते आपल्याकडे पूर्णपणे खेचण्यासाठी भाजपच्या पाटलांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडून प्रचाराची रणनिती विषयी चर्चा केली आहे. विरोधकांना तगडे आव्हान देण्यासाठी पाटील यांनी मनसे अघ्यक्षांना साद घालत आपल्या प्रचारातही त्यांचा पाठिंबा मिळावा याविषयी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Bhiwandi News: भिवंडी लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर; एकदिलाने महायुतीचे काम करण्याचा निर्धार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभेचे खासदार व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबई येथे ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली असून यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डि.के.म्हात्रे यावेळी उपस्थित होते. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा जाहीर केला आहे.

महायुतीला मनसेचा पाठिंबा मिळाल्याने याचा फायदा उमेदवारांना आपले मताधिक्य वाढविण्यास होणार आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघात मनसेचे वेगळे वजन राहीले आहे.

Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Bhiwandi News: भिवंडी लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर; एकदिलाने महायुतीचे काम करण्याचा निर्धार

आमदार, विरोधी पक्ष नेते पद या मतदारसंघांनी मनसेला दिले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचे वर्चस्व ठाणे जिल्ह्यात असले तरी उद्धव ठाकरे यांना समर्थन करणारे शिवसैनिक देखील तेवढ्याच ताकदीचे या भागात असून त्यांना तोंड देण्यासाठी राज ठाकरे यांची भूमिका महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भाजप सोबतच मनसेची जवळीक वाढली होती तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामिल होणार याविषयी चर्चा सुरु झाली होती. राज यांनी पाठिंबा जाहीर करत भाजप विषयी असलेले सलोख्याचे संबंध आणखी दृढ केले आहेत.

भाजपची साथ मिळताच भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने मनसेला मानाचे स्थान दिल्याचे पाहायला मिळाले. जाहीर सभांच्या भाजपच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकले, तसेच मनसेचे झेंडे देखील लागले. कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीने अद्याप आपला उमेदवार निश्चित केला नसल्याने मनसेने येथे अद्याप शांतता बाळगली आहे. मात्र भिवंडीचे उमेदवार पाटील यांनी अध्यक्ष राज यांची भेट घेतली त्यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मनसेचे एक ते सव्वा लाख मतदार आहेत.

Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Bhiwandi News: दुसऱ्यांच्या काँक्रीटवर किती वेळ उभे राहणार? तुमचे काँक्रीट दाखवा

आमदार राजू पाटील व खासदार कपिल पाटील यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. भूमिपुत्र तसेच खासदार पाटील यांना केंद्रीय पंचायत राज मंत्रीपद मिळाले. त्यावेळी भाजपच्या वतीने त्यांनी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. यावेळी कल्याण ग्रामीणमध्ये आमदार राजू पाटलांनी कपिल पाटील यांचे जंगी स्वागत केले होते.

कल्याण व भिवंडी मतदारसंघात मनसेचे मताधिक्य असून या मतांचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी आता कपिल पाटलांनी राज यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी राज यांचे आभार मानले. तर राज यांनी पाटलांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीती बद्दल सूचना केल्या आहेत. आता राज यांच्या रणनितीचा अवलंब करत पाटील विरोधकांना निवडणूकीच्या रिंगणात कसे तगडे आव्हान देतात हे पहावे लागेल.

Bhiwandi Loksabha: महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Bhiwandi Politics: ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा समोरासमोर बसू; सुरेश म्हात्रेंचे कपिल पाटलांना खुले आव्हान

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com