या शहरात कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाचा जबरजस्त अॅक्शन प्लॅन तयार; वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 रुपे क्लिनिकशी संबंधित डॉक्टरांच्या टीमनं गुरुवारपासून हॉटस्पॉट भागातील कोरोना व्हायरसच्या लक्षणांबद्दल नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 रुपे क्लिनिकशी संबंधित डॉक्टरांच्या टीमनं गुरुवारपासून हॉटस्पॉट भागातील कोरोना व्हायरसच्या लक्षणांबद्दल नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. येत्या 15 दिवसांत शहरात असलेल्या विविध हॉटस्पॉट्समधील एक लाखांहून अधिक नागरिकांचे स्क्रिनिंग केले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात एकूण प्रकरणांचा आकडा समोर येणं अपेक्षित आहे. दरम्यान अधिकारी वेळेवर प्रकरणं शोधून मृत्यूंची संख्या कमी होण्याचं सुनिश्चित करण्यावर भर देत आहेत.

BIG NEWS - महाराष्ट्रात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड, महाराष्ट्र तिसऱ्या स्टेजला ? स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत...

नवीन आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या (BNCMC)परिसरात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिशी संपर्क साधण्यास मदत करण्याच्या प्रयत्नांना या सेवेमुळे प्रोत्साहन मिळालं आहे. 

गेल्या काही आठवड्यांत तपासणीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढले असताना आमदार शेख म्हणाले की, अद्याप पुरेशा रुग्णांचा प्रभावीपणे शोध घेण्यासाठी कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

हॉटस्पॉट भागात पाळत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नागरी संस्था आणि 1 रूपये क्लिनिक आणि अहतेसाब फाउंडेशनने भागीदारी केली आहे.

आमदार रईस शेख यांनी सांगितलं की, भिवंडीमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे कारण मुख्यत: प्रकरणे लवकर नोंदवली गेली नाहीत. जर ऑक्सिजनची पातळी 90 असेल तर तेव्हा आम्हाला त्यांना वाचवणं सोपं होऊन जातं. मात्र काही रुग्ण 60 च्या पातळीसह येत आहेत. त्या क्षणी त्यांना वाचविणे खूप अवघड होते, असं ते म्हणाले.

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा ही पेमेंट पद्धत

1 रुपे क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं की, एक पथक लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या दारात जाऊन स्वॅब नमुन्यांसह तापमान पातळी, ऑक्सिजनची पातळी तपासतील. आम्ही वेळापत्रकानुसार काम करत आहोत. त्यात एक डॉक्टर, दोन पॅरामेडीक आणि बीएनसीएमसी कामगार आहेत

दररोज घेतल्या जाणार्‍या 200 चाचण्यांपैकी सुमारे 120 रुग्णांची चाचणी सकारात्मक असल्याचे घुले यांनी नमूद केले. उपचाराच्या सुविधांचा अभावामुळे मृत्यूचं प्रमाण उच्च असल्याचं ते म्हणाले. हे पथक दररोज 200 ते 400 पर्यंत चाचण्या घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शेख यांनी नमूद केलं. तसंच डॉक्टरांची एक टीम गंभीर रूग्णांना देण्यात येणारी औषधे आणि उपचारांवर लक्ष ठेवेल, असं शेख यांनी सांगितलं. 

स्थानिक नगरसेवकानं असं सांगितले की, बरेच रूग्ण भीतीमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे अधिकाऱ्यांना आपल्यी लक्षणं सांगत नाहीत. या समस्येचा सामना करण्यासाठी पालिकेनं जनजागृती करण्यासाठी स्थानिक समुदाय नेत्यांशी भागीदारी केली आहे आणि शहरात अधिक आयसोलेशन ठेवण्याचे केंद्र निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi Municipal Corporation will screen 1 lakh people