भिवंडीत कापड डाईग कंपनीला भीषण आग; कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक

शरद भसाळे
Thursday, 28 January 2021

भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

भिवंडी : भिवंडी तालुक्‍यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीत कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपनीला आज पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे तयार कापडाचे तागे व मशिनरी जळून खाक झाली आहे. भिवंडीसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन केमिकल मिश्रित पाण्याच्या साह्याने ही आग शांत केली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून, कोनगांव पोलिसांनी या आगीची नोंद केली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भिवंडी-कल्याण महामार्गावरील सरावली एमआयडीसीमध्ये कपिल रेयॉन कंपनीत कच्च्या कपडावर रंगाची प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाते. आज पहाटेच्या सुमारास अचानकपणे या कंपनीमध्ये आग लागल्याची बाब सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. या आगीची माहिती अग्निशमन दिल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र कंपनीमध्ये रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याने ती अधिक भडकली. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी कल्याण, ठाणे, उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले.

Bhiwandi textile dyeing company catches fire Burn cloth linen and machinery

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi textile dyeing company catches fire Burn cloth linen and machinery