MNS Mumbai : राज ठाकरेंना मोठा धक्का! BMC निवडणुकांच्या तोंडावर ‘मसल मॅन’चा तडकाफडकी राजीनामा

राज ठाकरे यांना पत्र लिहून सर्व पदांचा दिला राजीनामा
MNS Mumbai
MNS Mumbai Esakal

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे मसल मॅन म्हणून ओळखले जाणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.

ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर धुरी यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे म्हटलं आहे.

मनीष धुरी मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष होते. धुरी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग होता. त्यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पक्षात अचानक खळबळ उडाली. तसेच धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा आता रंगली आहे.

MNS Mumbai
Kasba Bypoll Election : "मुक्ताताई असत्या तर..." ; मतदान केल्यानंतर शैलेश टिळक भावूक

राज ठाकरे यांना पत्र लिहून मनीष धुरी यांनी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. वैयक्तिक कारणामुळे मी सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. तर यापुढे पक्षात राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचाही शब्द त्यांनी पत्रात राज ठाकरे यांना दिला आहे. पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे.

MNS Mumbai
Kasba by poll election: मतदानापूर्वी कसब्यातील नागरिकांना मारहाण; भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. मनसेनेही पक्ष बांधणीवर मोठा भर दिला आहे. अशातच धुरी यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com