
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बेठक पार पडली. त्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हेही वाचा - आजोबांचा नेम चुकला अन् नातवाला लागली गोळी; महाडमधील विचित्र घटना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बेठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये (Paddy Procurement Incentive Support) देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Big decision of state government for paddy growers Incentive per quintal