बदलापूरात मोठा अनर्थ टळला; MIDCतील एकापाठोपाठ दोन कंपन्यांना मोठी आग

आहुती त्रिवेदी
Saturday, 29 August 2020

बदलापुरात एका पाठोपाठ दोन कंपन्यांना आग लागली. बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

बदलापूर : बदलापुरात एका पाठोपाठ दोन कंपन्यांना आग लागली. बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली. 

वसईत पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वादात 'जनता गेली खड्डयांत'; रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण

शनिवारी (ता.29) दुपारी च्या सुमारास बदलापूर एमआयडीसीतील डी के केमिकल्स कंपनीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या कंपनीत असलेल्या ज्वलनशील पदार्थांना आग लागल्यामुळे आग भडकण्याचा धोका होता. त्यामुळे कंपनीतील अग्निशमन यंत्रणा व अग्निशमन वाहनांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवून पुढील दुर्घटना टाळण्यात अग्निशमन दल यशस्वी ठरले. 

यामध्ये कंपनीतील कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ही आग नियंत्रणात येत असतानाच मानकीवली येथील मानकीवली रेडसन इंटरप्रायजेस या कंपनीत फरनान्स ऑइल टॅंकला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यामुळे जवळच्या इतर कंपन्यांमध्येही आग पसरण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने आग नियंत्रणात येणे गरजेचे होते. 

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी वॉटर फोमचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर अधिकची कुमक म्हणून अंबरनाथ पालिका व आनंदनगर एमआयडीसी अग्निशमन दलासही पाचारण केले. सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे निश्चित कारण मात्र समजू शकलेले नाही.

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big fire to two companies in MIDC in badalapur