esakal | शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया

महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वकाही थांबलंय. कोरोनामुळे बळीराजाचं सर्वाधिक नुकसान झालंय. अशात महाराष्ट्रातील कर्जमाफी देखील रखडलीये.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वकाही थांबलंय. कोरोनामुळे बळीराजाचं सर्वाधिक नुकसान झालंय. अशात महाराष्ट्रातील कर्जमाफी देखील रखडलीये. मात्र अशात आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. अद्यापही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या महाराष्ट्रातील तब्बल चौदा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या तयार झाल्या असून लवकरच राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सहकार विभागाने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु केलीये . 

कोरोनामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला ब्रेक लागला होता. अशात आता सहकार विभागाने शेतकरी कर्जमाफीबद्दलच्या थांबलेल्या प्रक्रियेला सुरवात केलीये. सहकार विभागाने शेतकऱ्यांच्या आधार प्रामाणिकरणाला सुरवात केलीये. सरकारची परवानगी मिळताच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड करण्यात येतील. यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरवात होणार आहे. 

'माझी नोकरी तर जाणार नाही ना'? लॉकडाउनमध्ये तरुणांच्या मानसिक तणावात वाढ

नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी काय ? 

नियतमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय असा प्रश्न कायम विचारला गेलाय. अशात नॉयमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचं समजतंय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती समोर येतेय. याबाबतचा आदेश लवकर निघणार असल्याची माहिती समोर येतेय.  

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी महाराष्ट्रातील ३३लाख कर्मचारी पात्र ठरले होते. 

big news related to farmers loan wavier in maharashtra read full news

loading image
go to top