ड्रग्सप्रकरणी NCB ची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

पूजा विचारे
Tuesday, 8 September 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीनं ही कारवाई केली आहे. ड्रग्सप्रकरणी ही रियावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दोन दिवस चौकशी केल्यानंतर एनसीबीनं ही कारवाई केली.

मुंबईः  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीनं ही कारवाई केली आहे. ड्रग्सप्रकरणी ही रियावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दोन दिवस चौकशी केल्यानंतर एनसीबीनं ही कारवाई केली. याआधी रियाचा भाऊ शौविक याला एनसीबीनं अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे.

रियाची आधी मेडिकल केली जाईल. एनसीबी ऑफिसच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्टसाठी नेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग तीन दिवस एनसीबीकडून रियाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रियाला आज अटक करण्यात आली. पहिल्या दिवशी रियाची ६ तास तर दुसऱ्या दिवशी ८ तास चौकशी केली. 

ड्रग्जच्या संबंधात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतल्यानंतर रियावरही अटकेची टांगती तलवार होती. आज अखेर तिला अटक केली आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रियाचं नाव पुढे आलं आहे. या चौकशीदरम्यान रियाचा ड्रग्स प्रकरणातही तिचं नाव घेतलं गेलं. त्यानंतर रियाला समन्स बजावून एनसीबीनं तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर तिची सलग तीन दिवस चौकशी केली आणि नंतर तिला अटक केली आहे. रियाने एका महत्त्वाच्या गोष्टीची कबुली देखील एनसीबीला दिली. आपण बडने भरलेली सिगरेट ओढायचो हे तिनं कबुल केल्याचं म्हटलं जात आहे. रिया गांजाची सिगरेट ओढायचं समोर आलं आहे. सुशांतसोबत ही सिगरेट ओढत असल्याची कबुली तिने दिली. 

 

दरम्यान एनसीबीने रियाच्या घरातून तिचा जुना मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब अशा गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या फॉरेंसिक चाचणीत ही माहिती समोर आली. रिया चक्रवर्तीची रविवारी एनसीबीनं पहिल्यांदा चौकशी केली होती. या चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शौविक या दोघांची समोरसमोर बसून चौकशी केली. यावेळी रिया एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. त्यानंतर रियाची  ६ तास चौकशी करण्यात आली होती. यात रियाला ६० ते ७० प्रश्न विचारण्यात आले. यातील अनेक प्रश्नांची उत्तर रियाने दिली होती.

Big update in Sushant Singh Rajput case Riya Chakraborty arrested by NCB


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big update in Sushant Singh Rajput case Riya Chakraborty arrested by NCB