
बनावट आयात-निर्यात कोडच्या मदतीने चढ्या भावाने निर्यात केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने जोगेश्वरीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक केली. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत 58 संशयीत कोडवरून 291 कोटींची निर्यात केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबई ः बनावट आयात-निर्यात कोडच्या मदतीने चढ्या भावाने निर्यात केल्याप्रकरणी सीमा शुल्क विभागाने जोगेश्वरीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक केली. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत 58 संशयीत कोडवरून 291 कोटींची निर्यात केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
राज्य सरकारने वीजबिलाबाबत 'दिल्ली पॅटर्न' राबवावा; कोणी केली ही मागणी वाचा
आदेश सापळे(44) असे अटक आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी पूर्व येथील केवस् रोड येथील रहिवासी आहे. तो स्काय टच एव्हीएशन कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली. आरोपीने निर्यात गैरव्यवहार करण्यात साठी बनावट आयात निर्यात कोड वापर केला. आरोपीने एकूण 58 बोगस आयात निर्यात कोडचा वापर केला असून त्यातील 22 कोड अस्तित्त्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यातून एकूण 292 कोटी किमतीच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे. अस्तीत्त्वात नसलेल्या 22 आयात निर्यात क्रमांकावरून 145 कोटींची निर्यात करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये 14 कोटींचा जीएसटी व अडीच कोटींचा कर परतावा घेण्यात आल्याचे सीमाशुल्क विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
दक्षिण आफ्रीकेत, आखाती देशात कार्गोमधून कपडे चालले होते. संशयावरून सीमा शुल्क विभागाने या मालाची तपासणी केली असता आतील कपडे जूने असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी या माल पाठवत असलेल्या प्रीन्स एन्टरप्रायझेसच्या 16 संशयीत बिलांची तपासणी केली होती.
... तर वाहने बँकेत जमा करू! खाजगी वाहतुकदारांचा इशारा; कर्ज फेडण्यात अडचणी
त्यानंतर त्यांनी त्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात भेट दिली असता तेथे अशी कंपनी अस्तित्त्वात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी सीमाशुल्क ब्रोकरकडे चौकशी केली असता आरोपीचे नाव याप्रकरणी पुढे आले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. तो या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सीमाशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )