Raigad : नवीन रस्त्यावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road

नवीन रस्त्यावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च?

कर्जत : शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथील रस्त्यांसाठी एमएमआरडीएने १७ कोटी ८० लाखांच्या निधीची तरतूद केली आहे; परंतु हे रस्ते दोन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले असून चांगल्या स्थितीत असल्याने ते खोदून पुन्हा त्यावर कोट्यवधींचा खर्च करणे म्हणजे फसवणूक करण्यासारखी असून कंत्राटदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी घातलेला हा घाट असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे कर्जत पालिकेतील गट नेते शरद लाड यांनी केला आहे.

शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी प्रभाग क्रमांक दोनमधील प्रस्तावित कामांच्या रस्त्यांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यांच्या प्रस्तावित कामाला मंजुरी मिळवत एमएमआरडीएच्या माध्यमातून १७ कोटी ८० लाखांच्या निधीची तरतूद करून घेतली. मात्र या सर्व रस्त्यांचे २०१९ मध्येच म्हणजेच दोन वर्षांपूर्वीच डांबरीकरण केले आहे. या रस्त्यांवर फारशी वर्दळ नसल्याने ते रस्ते सुस्थितीत आहेत. त्यामुळे चांगले रस्ते खोदून त्याच जागी नवीन रस्ते बनवणे म्हणजे पैशांचा अपव्यय नाही का, असा सवालही लाड यांनी केला.

रस्ते आणि खर्च करण्यात येणारा निधी

  1. दहिवली येथील तातेर फ्लोरेन्सकडून इंजिनिअरिंग कॉलेजकडे जाणारा रस्ता : ४ कोटी ५० लाख

  2. जुने वेणगावकडे जाणारा रस्ता : ४ कोटी ३० लाख

  3. समर्थनगर व सुयोग नगर येथील अंतर्गत रस्ता बांधकाम व गटारे : ४ कोटी ५० लाख

  4. पेट्रोल पंपासमोरील मुख्य रस्ता रुंदीकरण व अंतर्गत बांधकाम : ४ कोटी ५० लाख

loading image
go to top