Police Crackdown : कल्याणमध्ये गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा ‘बिंदास म्हात्रे’ गजाआड, 62 हजारांचा शस्त्रसाठा जप्त

Police Investigation : कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातून पोलिसांनी गावठी पिस्तुल, मॅगझिन आणि जिवंत काडतूसांसह बिंदास म्हात्रे (वय 36) याला अटक केली असून, त्याच्याकडून 62 हजार रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
Police Crackdown
Police Crackdown Sakal
Updated on

डोंबिवली : 10 - गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा ‘बिंदास म्हात्रे’ (वय 36) याला कल्याण गुन्हे शाखा, घटक 3 युनिटच्या पथकाने अटक केली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेत त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता, एक देशी पिस्तुल, मॅगझिन, दोन जिवंत काडतूस आणि एक काडतुसाची पुंगळी असा एकूण 62 हजारांचा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com