
मुंबईत कावळे आणि कबूतरांचे मृत्यू झाल्याच्या घटना आज घडल्या. पक्ष्यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे दोन दिवसांत 170 दूरध्वनी आले आहेत;
मुंबई : मुंबईत कावळे आणि कबूतरांचे मृत्यू झाल्याच्या घटना आज घडल्या. पक्ष्यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे दोन दिवसांत 170 दूरध्वनी आले आहेत; मात्र अद्याप कोंबड्यांच्या मृत्यूची माहिती आली नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले; तर मटण विक्रेत्यांना मुखपट्ट्या (मास्क) आणि हातमोजे (ग्लोव्हज्) घालण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील चेंबूर टाटा कॉलनीतील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट होताच महानगरपालिकेने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पथक तयार केले आहे. यात मृत पक्षी आढळल्यास महानगरपालिकेच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेकडे आजवर 170 च्या आसपास दूरध्वनी आले आहेत. यात प्रामुख्याने कावळे आणि कबूतरांच्या मृत्यूंची माहिती देण्यात आली. काही ठिकाणी एकदोन पक्ष्यांच्या मृत्यूचेही दूरध्वनी आले आहेत, अशी माहितीही देण्यात आली. या पक्ष्यांना पुरण्यात येत असून त्यात चुनखडीचा वापर केला जात आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईत अद्याप कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रकार घडलेले नाहीत. मुंबईत कुक्कुटपालन केंद्रे नसल्याने तशी भीतीही नाही; मात्र तरीही कोंबड्यांचे मांस विकणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची सूचना महापालिकेने केली आहे.
Birds Flu Crow pigeon deaths in Mumbai But the hens dont know
------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )