Birds flu | महाडच्या वहूर गावात कावळ्यांची तडफड! काही मृतावस्थेत; ग्रामस्थांमध्ये भीती

सुनिल पाटकर
Friday, 15 January 2021

बर्ड फ्लूचे हे लोण आता महाड मध्ये पोहचल्याची भिती वर्तवली जात आहे  कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झालाय का याची खात्री तपासणी केल्यानंतरच केली जाणार आहे.

महाड - देशभरात  बर्ड फ्लू वेगाने पसरत असतानाच महाड तालुक्यातील वहूर गावात आज सकाळी पाच कावळे मृतावस्थेत तर एक कावळा तडफडत असल्याचे आढळून आल्याने बर्ड फ्लुच्या शक्यतेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बर्ड फ्लूमुळे कोंबड्यां प्रमाणेच गेली कांही दिवस अनेक पक्षी मृत होताना दिसत आहेत. बर्ड फ्लूचे हे लोण आता महाड मध्ये पोहचल्याची भिती वर्तवली जात आहे  कावळ्यांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लूमुळेच झालाय का याची खात्री तपासणी केल्यानंतरच केली जाणार आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले असले तरी भीती न बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

जगभरात कोरोनामुळे लाखो नागरिक दगावले असून आजही कोरोनाचा प्रादुर्भाव  पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यातच आता विविध पक्ष्यांना बर्ड फ्लूने विळखा घातला आहे. राज्यातील विविध भागात बर्ड फ्लूमुळे कावळे, बदक, कोंबड्या मृत पडल्या आहेत. बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्लूचा विषाणू मानवी शरीरात शिरकाव करू शकतो यामुळे अशा पक्ष्यांच्या संपर्कात येण्याचे टाळले जाण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  महाड तालुक्यातील वहूर गावात शुक्रवारी सकाळी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अनंत नवले यांच्या घराशेजारी हे कावळे मृतावस्थेत आढळून आले. सरपंच जितेंद्र बैकर यांनी हि माहिती तत्काळ तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि या पक्ष्यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाला आहे का अन्य कांही कारण आहे याचा तपास केला जाणार आहे.

 

मृत कावळ्यांचे नमुने
 पुणे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाठवून दिले आहेत. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झालाय का हे अहवाल आल्यानंतरच पुढे येईल
एस.एस.चिखलकर,
पशुधन पर्यवेक्षक दासगाव

birds flu in Mahads Vahur village Some birds dead 

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birds flu in Mahads Vahur village Some birds dead