vasai birthday
vasai birthdaysakal media

लसीकरणापासून वंचित असलेल्यांना लस देऊन पत्नीचा वाढदिवस साजरा

Published on

मुंबई : आपल्या जवळच्या माणसाचा वाढदिवस (birthday) काहीसा हटके व्हावा यासाठी सारेच प्रयत्न करत असतात. मग कोण त्याचा इव्हेन्ट (event) करतो तर कोण वेगवेगळ्या ठिकाणी देणग्या (donation) देऊन साजरा करत असते. परंतु आता कोरोनाच्या सावटामुळे (corona pandemic) हे वाढ दिवशी साजरे करण्यावर बंधन आले आहे. यातून बाहेर येत वसईतील उद्योजक (vasai businessman) यांनी मात्र आपल्या पत्नीचा (wife) वाढदिवस थोडासा हटके पण समजा पुढे एक वेगळा आदर्श उभा करून साजरा केला आहे. त्याची चर्चा सद्या वसई (vasai) मध्ये चांगलीच रंगली आहे.

वसई विरार मध्ये लसीकरण सुरु असले तरी सद्या पालिकेला लसीचा तुटवडा असल्याने अनेक जण लसी पासून वंचित आहेत. त्यातच आता काही ठिकाणी विकत लस मिळत असली तरी ती सातशे आणि आठशे रुपयांना असून तेवढे पैसे गरिबा कडे नसल्याने ते लसीपासून वंचित राहत आहेत. तर दुसरीकडे अपंग,रोजनदारीवरील कामगार आणि चर्च मधील दत्तक कुटुंब यांना लस मिळणे दूरचीच असल्याने गरजू व वंचित समाज घटकाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सांडोर-सेंट थॉमस धर्मग्रामातील दानशूर सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक ऑल्विन मनवेल परेरा यांनी पुढाकार घेतला आहे.

vasai birthday
शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मांचा फोटो

कार्डिनल ग्रेशियस रुग्णालय व वसई-बंगली येथील लोकसेवा मंडळाच्या सहकार्याने त्यांनी आपल्या पत्नी सौ. ज्योती परेरा यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून 220 गरजूंचे मोफत लसीकरण करून एक वेगळी भेट वसईचे माजी आ. डॉमनिक घोन्सालवीस यांनी प्रेरणा यांनी पत्नीच्या वाढ दिवस निमित्य परेरा यांनी राबविलेल्या उक्र्माचे कौतुक या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून केले. या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या लाभार्थ्यांमध्ये विन्सेंट दी पॉल सोसायटीच्या 12 विविध चर्चमधील दत्तक कुटुंबिय, अपंग, आदिवासी, रोजंदारी कामगार या वर्गाचा समावेश होता. यात सर्वधर्मियांना समाविष्ट करुन घेण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाबद्दल लोकसेवा मंडळाकडून ऑल्विन परेरा यांचा ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com