राजकारणासाठी पीएम केअर्समधून दिलेले व्हेंटिलेटर महापालिका वापरत नाही ; भाजपचा गंभीर आरोप

व्हेंटिलिटर
व्हेंटिलिटर

मुंबई  ः केंद्र सरकारने पीएम केअर्स योजनेतून मुंबईकरांसाठी पाठवलेले व्हेंटिलेटर महापालिकेतील सत्ताधारी प्रशासन जाणुनबुजून वापरत नसल्याचा आरोप भाजपचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी केला आहे. करून दाखवल्याचे फलक लावणाऱ्यांनी मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 
 कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी पीएम केअर्स योजनेतून दोन आठवड्यांपूर्वी दहा व्हेंटिलेटर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवले होते. मात्र ते अद्यापही तेथे धूळ खात पडून आहेत, काही व्हेंटिलेटर तर खोक्‍यांमधून काढलेही नाहीत, असा दावा खणकर यांनी केला आहे. त्यांची अवस्था दाखविणारी छायाचित्रेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. केवळ या व्हेंटिलेटरचे श्रेय केंद्रातील भाजप सरकारला मिळू नये, अशा कोत्या राजकारणामुळे ती वापरली जात नसल्याचा आरोपही त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला आहे. 


व्हेंटिलेटर रुग्णांसाठी वापरले जात नाहीत, महामुंबई परिसरात अनेक रुग्ण व्हेंटिलेटरअभावी मृत्युमुखी पडले आहेत. अशा स्थितीत महापालिका प्रशासनाची ही कृती योग्य नाही. हे व्हेंटिलेटर तसेच ठेवून द्यायचे व नंतर परत पाठवायचे, असा प्रशासनाचा डाव यामागे असल्याचा आरोपही खणकर यांनी केला. एकदा हे व्हेंटिलेटर परत पाठवले की नंतर हल्लीच्या नव्या पद्धतीने निविदा न मागवता महागडे व्हेंटिलेटर खरेदी केले जातील. अशा प्रकारे मुंबईकरांना आम्हीच व्हेंटिलेटर पुरवले, असा प्रचारही महापालिकेतील सत्ताधारी करतील, अशी शक्‍यताही त्यांनी वर्तविली. 


मात्र सत्ताधारी पक्ष असे राजकारण करणार असेल तर ते शहरवासीयांचे दुर्दैव आहे. हे व्हेंटिलेटर तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नाहीत, त्यांना कनव्हर्टर नाही, त्यातील प्राणवायूचा पुरवठा करणारी यंत्रणा नीट नाही, असे पोकळ दावे प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र खरेच असे असेल तर त्यांची तात्काळ दुरुस्ती करून ती वापरली जावीत. मुंबईत जास्त व्हेंटिलेटर असतील तर शेजारच्या शहरांमधील रुग्णांवर उपचार करण्यासाठी ती वापरली जावीत. भले या व्हेंटिलेटरचे उद्घाटन शिवसेना नेत्यांनी करावे, त्याचे श्रेय घ्यावे, करून दाखवले चे फलक लावावेत, भाजपला अजिबात त्याचे श्रेय देऊ नये, पण कृपया त्यांचा वापर करावा, ते व्हेंटिलेटर खोक्‍यातच ठेऊन मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नका, अशी विनंतीही खणकर यांनी केली आहे. 


दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या दहा व्हेंटिलेटरची जोडणी करून ते सुरू करण्यासाठी अभियंते आले होते. मात्र त्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या, आता त्यांचे वरिष्ठ अभियंता आल्यावर या व्हेंटिलेटरचा वापर सुरू केला जाईल. 
- पी. पी. नगरकर, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय. 

 

BJP alleges that Mumbai Municipal Corporation does not use the ventilator provided by PM Kers

( संपादन ः रोशन मोरे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com