
डोंबिवली : आगामी पालिका निवडणूका लक्षात घेत भाजपने ठाणे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पदांवर नवनियुक्त्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ आता शिवसेना ठाकरे गटाने देखील कल्याण ग्रामीण भागात भाकरी फिरवली असून दिव्यातील आक्रमक शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या रोहिदास मुंडे यांच्यावर मातोश्रीने विश्वास दाखवत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. तशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.