Ashish Shelar: मविआला 18 जागा मिळाल्या तर संन्यास घेतो म्हणणाऱ्या आशिष शेलारांचा घुमजाव, म्हणाले, आधी...

BJP Ashish Shelar Statement: मविआला १८ जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन असं शेलार एका व्हिडिओमध्ये म्हणत असताना पाहायला मिळाले होते.
Ashish Shelar
Ashish Shelar

मुंबई- महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत १८ देखील जागा मिळणार नाहीत. मविआला १८ जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन असं शेलार एका व्हिडिओमध्ये म्हणत असताना पाहायला मिळाले होते. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शेलार यांनी आता घुमजाव केला आहे.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की उद्धव ठाकरेंनाच संन्यास घ्यावा लागेल. कारण उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपला देशात ४५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. आता ते तोंड का लपवत आहेत? भाजपला ४५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता ते संन्यास घेणार का हे सांगावे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Ashish Shelar
आशिष शेलारांनी उज्वल निकमांना उत्तर मध्य मुंबईतून उतरवून डाव जिंकला?

भाजप नेते आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीआधी एक वक्तव्य केलं होतं. यावरुन सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी आशिष शेलारांवर निशाणा साधला. शेलार आता कुठे गेले आहेत? ते कधी राजीनामा देणार आहेत, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं, असा टोला त्यांनी लगावला.

Ashish Shelar
Parbhani Lok Sabha Result : संजय जाधवच परभणीचे ‘बॉस’! ; महादेव जानकर यांना परभणीकरांनी नाकारले

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आशिष शेलार यांची फिरकी घेतली होती. आशिष शेलार तुम्ही कधी संन्यास घेणार आहात ते सांगा. म्हणजे तुमच्यासाठी रूद्राक्षाची माळ, काठी, लोटी, भगवी कफनी देण्याची सोय करता येईल, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली होती.

महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. महाविकास आघाडीला राज्यात ३० जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. गेल्या लोकसभेला भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी पिछेहाट मानली जाते. दुसरीकडे, काँग्रेसने मोठे यश मिळवलं आहे. काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. शिवाय अपक्ष विशाल पाटील त्यांच्या बाजूने असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com