esakal | 'मुंबईत रस्त्यांचे "रस्ते" लागले, तिच थूकपट्टी...'; भाजपाचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

pothole in Mumbai Municipal Corporation

'मुंबईत रस्त्यांचे "रस्ते" लागले, तिच थूकपट्टी...'; भाजपाचा हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मुंबईत खड्ड्यांचा मुद्दा (pothole issue) चांगलाच तापला आहे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी महत्त्वाची बैठक घेतली. खड्ड्यांच्या प्रश्नावरुन भाजपा (bjp) आणि मनसे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप तर या मुद्यावरुन चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी आमदार नितेश राणे यांनी टि्वट करुन अत्यंत बोचरी टीका केली होती. "रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना कर दात्यांचा पैसा दिला जातो. पण तरी ते त्यांचे काम चोख करत नाहीत. मग मुख्यमंत्री कंत्राटदारांना शासना का करत नाही?" असा सवाल नितेश राणे यांनी विचारला होता. "शिवसेनेच्या जवळ असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे? की, ही फक्त नौटंकी आहे" अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.

हेही वाचा: मी 'भाई' युनिव्हर्सिटीमध्ये गेलो नाही; छगन भुजबळ कडाडले

आता याच मुद्यावरुन भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. "गेल्या 24 वर्षात 21हजार कोटी खड्ड्यात घातले. तरी मुंबईतील रस्त्यांचे "रस्ते" लागले. आता धावाते दौरे करुन..कारवाईचा आरडाओरड करुन..काय सांगयताय..? “मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी!” तेच कंत्राटदार..त्याच निविदा..तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना..खड्ड्यांनी पितळ उघडं केलं!" असं आशिष शेलार यांनी टि्वट केलं आहे.

हेही वाचा: दबावाला बळी पडून आरक्षणाचा निर्णय नको; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

महापौर काय म्हणाल्या?

कार्यालयात बसून काम करु नका तर रस्त्यावर उतरून काम करा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे. येत्या 15 दिवसात खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने पुर्ण होऊन नागरीकांना दिलासा मिळेल.असा विश्‍वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

loading image
go to top