esakal | अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेली घरे पुन्हा बांधून द्या- अतुल भातखळकर
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhatkhalkar

अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेली घरे पुन्हा बांधून द्या- अतुल भातखळकर

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : मागील तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे (Mumbai Rain) व काल रात्रीच्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) नुकसान झालेल्या उपनगरांतील बाधितांना, दुकानदारांना व ऑटोरिक्षा चालकांना तात्काळ प्रत्येकी दहा हजार रुपये मदत (Help) करण्याची मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाली, त्यांना तहसीलदारांमार्फत नजर पंचनामे करून ती पुन्हा बांधून द्यावीत, असेही त्यांनी म्हटले आहे. ( BJP Atul Bhatkhalkar Demand of Help For rainfall Affected People to Aditya Thaceray-nss91)

कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या मुंबईकर चाळकरी व झोपडीवासियांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात पाणी साचून ऑटोरिक्षा व दुचाकी वाहने सुद्धा नादुरुस्त झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत, मात्र जिल्ह्याच्या 'तत्पर व कर्तव्यदक्ष' पालकमंत्र्यानी मदत तर सोडाच पण साधे नजर पंचनामे करण्याचे सुद्धा अद्याप आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे किमान आता तरी तहसीलदारांच्या माध्यमातून नजर पंचनामे करून ज्याच्या घरांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा घरे बांधून देण्याची मागणी सुद्धा भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा: 'या' निर्णयाबाबत प्रविण दरेकरांचे राज्य सरकारवर टीकास्त्र, म्हणाले...

कोरोना साथीमध्ये राज्य सरकारने एका रुपयाची ही मदत मुंबईकरांना केली नाही. इतकेच नव्हे तर मागील वर्षी आलेले निसर्ग चक्रीवादळ असो किंवा यावर्षी आलेले तौक्ते चक्रीवादळ असो किंवा मागील वर्षभराच्या काळात चार वेळा झालेली अतिवृष्टी असो, राज्य सरकारने कोणतीही मदत मुंबईकरांना केली नाही. ऐंशी हजार कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे सुद्धा वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही, असेही भातखळकर यांनी पत्रात दाखवून दिले आहे.

loading image