Chandrakant Patil
Chandrakant PatilGoogle

"मराठा आरक्षणाचा खून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला"

मराठा आरक्षणासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना
Summary

मराठा आरक्षणासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय दिला. त्यानंतर भाजप (BJP) विरूद्ध ठाकरे सरकार (Mahavikas Aghadi) असा सामना सुरू झाला. तत्कालीन फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने विधानसभेत केलेला कायदा हा फुलप्रूफ नव्हता, असं मत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केलं. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिलं. "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व कार्यवाही करून मराठा आरक्षण दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी त्याला स्टे दिला नाही. या आरक्षणाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने खून केला. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वाचल्यावर कळत की शासनाने जिद्दीने केस लढवली नाही. पण आता भाजपने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अंतर्गत समिती नेमली आहे. मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. यात आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनायक मेटे, नरेंद्र पाटील हे नेते आहेत", अशी घोषणा त्यांनी केली. (BJP Chandrakant Patil says Maratha Reservation Murdered by Congress NCP Govt)

Chandrakant Patil
राजीव सातव, तू हे काय केलेस...; संजय राऊतांची भावनिक पोस्ट

"मराठा समाजात परिस्थिती बिघडत चालली आहे. मनातला संताप काही दिवसांनी ओसरेल, पण आयुष्य उध्वस्त झाली आहेत. कोविड लॉकडाऊन 2 वेळा वाढवला, तसा मराठा समाजाचं आरक्षण ढकललं जाईल असं बहुतेक त्यांना वाटतंय. मराठा समाज आंदोलन करेल, त्यात खांद्याला खांदा लावून भाजपसोबत असेल", अशी खात्री त्यांनी दिली. "या कायद्याबाबत भेटीगाठी सुरू आहेत. हे सरकार कस कमी पडलं, त्याची पोलखोल आम्ही करणार आहोत", असा इशारा त्यांनी दिला.

Chandrakant Patil
CM उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्याशी चर्चा

"मराठा समाज त्यांच्या ताकदीने जे आंदोलन करेल, त्यात झेंडा, घोषणा भाजपच्या न करता सामील होणार. राज्याला अधिकार आहे असं फेरयाचिकेतून समजलं. महाराष्ट्र शासनाने 102 व्या घटना दुरुस्तीबाबत फेर याचिका दाखल केली पाहिजे", असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com