
Chandrashekhar Bawankule criticize Shivsena Uddhav Thackeray
मुंबई- सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जी चूक त्यांनी केलीये, ती त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे ते सामना अग्रलेखातून त्यांच्यावर टीका करत आहेत. आम्ही सामना वृत्तपत्राविरोधात तक्रार करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
वृत्तपत्रात लिहिण्याला काही मर्यादा असते. त्यामुळे मुंबईचे कार्यकर्ते 'सामना' विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. 'सामना' जी आग ओकत आहे, ती आम्हाला थांबवावीच लागणार आहे. लवकरच याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहोत. सामना वृत्तपत्राचे अधिकार किती आहेत. ते अधिकार कसे वापरतात याचा पुढच्या काळात विचार करणार आहोत, असं ते म्हणाले.
सामना विरोधात रस्त्यावर उतरुन आणि न्यायालयीन अशी दोन्ही प्रकारची लढाई आम्ही लढायला तयार आहोत. याबाबत योजना तयार करण्याचे सुरु आहे. एखाद्या वृत्तपत्राला परवानगी दिली म्हणजे त्याचा कोणाच्या जीवनावर, वैयक्तिक टीका-टीप्पणी करण्यासाठी अधिकार वापरायचा. नियमाच्या बाहेर जावून जे वृत्तपत्राला दिलेले स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या स्वांतत्र्याच्या बाहेर जाऊन जे लिहिलं जातंय ते खपवून घेण्यासारखं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळलेत, त्यांचं डोकं काम करत नाहीये. पुन्हा सत्तेत यायची संधी नाहीये. पक्ष फुटलाय, पक्षाचं चिन्हही गेलंय. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली आहे. त्यामुळे आता आयुष्यात कधीही सत्तेत येऊ शकत नसल्याचं त्यांना दु:ख आहे. त्यामुळे त्यांना दोन प्रकारचं दु:ख आहे. एक सत्ता गेल्याचं आणि दुसरं कधीही सत्तेत न येण्याचं, अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीये.
२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. येत्या निवडणुका एकनाथ शिंदे, अजित पवार गट आणि भाजप एकत्रच लढणार आहे. विरोधक काहीही बोलत असतात.बहुमत असलेलं आमचं सरकार आहे. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील आणि पुढेही राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.