
राज्य सरकारकडून कपिल सिब्बल यांना या खटल्याचा युक्तीवाद करण्यासाठी प्रति सुनावणी 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. या मुद्द्यावर भाजपने बोट ठेवले आहे
मुंबई - मुंबई पोलिसांनी फेक टीआरपी प्रकरण उघडकीस आणत, दोन मराठी टेलिव्हिजन वाहिन्या आणि रिपब्लिक वृत्त वाहिनीच्या संपादकांना नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीला संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. फेक TRP प्रकरणी जर "रिपब्लिक टीव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांना एफआयआरमध्ये आरोपी म्हणून समावेश करणार असाल तर त्यांना आधी समन्स बजावून त्यांची चौकशी करावी, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते. तसेच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा सीलबंद अहवाल दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी राज्य सरकारकडून जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल युक्तीवाद करीत आहेत.
यंदा ओढणी उडे.. ना! तरुणाईचा हिरमोड; कोरोनामुळे दांडियाचा आवाज बंद
राज्य सरकारकडून कपिल सिब्बल यांना या खटल्याचा युक्तीवाद करण्यासाठी प्रति सुनावणी 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. या मुद्द्यावर भाजपने बोट ठेवले आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणी राज्य सरकारला घेरले आहे. ''अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी कपिल सिब्बलना प्रत्येक सुनावणीसाठी 10 लाख रुपये. सूडाच्या राजकारणासाठी ठाकरे सरकारकडे बक्कळ पैसा आहे, पण शेतकऱ्यासाठी नाही. सत्तेवर बसलेल्या मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी हे सरकार काम करते आहे. जनता वाऱ्यावर...'' असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी कपिल सिब्बलना प्रत्येक सुनावणीसाठी 10 लाख रुपये.
सूडाच्या राजकारणासाठी ठाकरे सरकारकडे बक्कळ पैसा आहे, पण शेतकऱ्यासाठी नाही. सत्तेवर बसलेल्या मूठभर लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी हे सरकार काम करते आहे. जनता वाऱ्यावर...@OfficeofUT pic.twitter.com/PDaAJcqi2w— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 21, 2020
राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपने आक्रमक होऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली नसल्याने, भाजपची राज्य सरकार वर टीका सुरू आहे. त्यातच भाजपने एॅड कपिल सिब्बल यांना दिलेल्या मानधनामुळे राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील राज्य सरकारची कारवाई सूडाच्या राजकारणापोटी असल्याचा ओघ भातखळकरांचा आहे. त्यामुळे सूडाच्या राजकाराणासाठी बक्कळ पैसा आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा नाही. अशी सडकून टीका भातखळकर यांनी केली आहे.
-------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )