

BJP Sena
ESakal
मुंबई : भांडुप, विक्रोळी या मराठमोळ्या मतदारसंघांतील बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येकी एका प्रभागात भाजपचे पदाधिकारी महायुतीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणार आहेत. भांडुपमधील प्रभाग क्रमांक १०९ शिवसेनेच्या (शिंदे गट) पारड्यात पडल्याने भाजपचे मंडल महामंत्री गणेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडाचे निशाण फडकावले. शेजारील ११० प्रभागांत भाजपने मुंबईबाहेरून उमेदवार आयात केल्याने निष्ठावंत कार्यकर्त्या मीरा ठाकूर अपक्ष लढण्याच्या तयारीत होत्या.