esakal | "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal-Gambhir-Desai

"हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

sakal_logo
By
विराज भागवत

भाजपच्या महिला नेत्याची ठाकरे सरकारवर अत्यंत खोचक शब्दांत टीका

मुंबई: गेले काही दिवस राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेतेमंडळी महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहे. पण महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आंदोलने करणे म्हणजे, नव्या सुनेला पोळ्या करणं जमत नसल्याने सासूला बोल लावत स्वत:च्या अंगावर पिठाचा डबा रिकामा करण्यासारखे आहे, अशा अत्यंत खोचक शब्दांत भाजप महिला मोर्चाच्या मुंबई प्रमुख शीतल गंभीर देसाई यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. (BJP Female Leader Sheetal Gambhir Desai taunts Mahavikas Aghadi Govt over Inflation prices hike issue)

हेही वाचा: खडसेंनंतर आता भाजप आमदाराच्या तोंडी 'ED अन् CD'ची भाषा

"महागाईमुळे लोकांचे हाल होत असल्याचे कारण देत काँग्रेसतर्फे गेले काही दिवस राज्याच्या प्रमुख शहरांत आंदोलन करण्यात येत आहेत. आंदोलनाची नाटके करण्याबाबत काँग्रेसला आता केजरीवाल यांचा गुण लागला आहे. नव्या नवरीला पोळ्या करता येत नाहीत म्हणून सासूला बोल लावत पिठाचा डबा स्वतःच्या अंगावर रिकामा केल्याने काहीच होणार नाही. उलट तिने सासूच्या मदतीने किंवा स्वतःच स्वयंपाक शिकायचा असतो. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला महागाईसंदर्भात लोकांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी फक्त केंद्राला दोष देऊ नये. तर त्याऐवजी आपल्याकडून कठोर निर्णय घ्यावेत. मात्र महाविकास आघाडी ते करणार नाही", असे शीतल देसाई यांनी सुनावले.

शीतल गंभीर देसाई

शीतल गंभीर देसाई

हेही वाचा: "तर त्याच मशालीने विमानतळ जाळून टाकू"; उद्धव ठाकरेंना इशारा

"राज्य सरकारला लोकांबद्दल इतकाच कळवळा आला असेल तर केरळ सरकारने कोविड काळात जनतेला भरघोस सवलती दिल्या आहेत तशा सवलती महाविकास आघाडीने राज्यात द्याव्यात. महामुंबईत सरकारने रेल्वे बंद केल्याने नोकरदारांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एसटी किंवा स्थानिक परिवहन सेवेतील बसचे भाडे-कर कमी करावेत. किंवा लोकांचे हाल अगदीच पहावत नसतील तर निदान कोरोना काळात तरी अत्यल्प दरात किंवा मोफत प्रवास करण्याची सवलत द्यावी. हे उपाय महाविकास आघाडी जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत त्यांना केंद्र सरकारवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. आंदोलनाच्या नाटकासाठी काँग्रेस नेत्यांनी वापरलेल्या सायकली जरी सामान्य नागरिकांना देऊन टाकल्या तरीही लोकांचा मोठा त्रास वाचेल. नाहीतरी काँग्रेस नेत्यांची सायकलीने फिरण्याची सवय कित्येक दशकांमध्ये मोडली आहे", असा टोमणाही त्यांनी मारला.

loading image