

मुंबई: घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम (Bjp ghatkopar mla ram kadam) यांना खार पोलिसांनी (Khar police) ताब्यात घेतलं होतं. भाजपाकडून मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मंदिर उघडण्याची (opening temple) मागणी करण्यात येत आहे. आज याच मागणीसाठी राम कदम आक्रमक झाले होते. ते दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak temple) दिशेने निघालेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना, राम कदम निर्णयावर ठाम होते. कार्यकर्त्यांसह राम कदम हे सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने जात होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना राम कदम निर्णयावर ठाम होते. कार्यकर्त्यांसह राम कदम यानी इमारती बाहेर पाऊल टाकताच खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पण नंतर त्यांना पोलिसांनी समज देऊन सोडलं. कदम यांना पोलिसांनी या पूर्वी १४९ ची नोटीस बजावली होती. राम कदम यांना बिल्डिंग बाहेर जाऊ न देण्याचे स्थानिक पोलिसांना आदेश होते.
राम कदम काय म्हणाले?
"पोलिसांबद्दल प्रचंड आदर आहे. पण त्यांच्या बळाचा वापर केला जातोय. हे सरकर अपशकुनी आहे. जेव्हापासून आलयं तेव्हा काहीना काही संकट येतंच आहेत. श्रद्धा सबुरी मंदिराबाबत येते. मात्र बार आणि दारूच्या गुत्यावरून हप्ते मिळत असल्याने ते उघडले. सर्व काही उघडलं आहे. मग मंदीरातच कोरोना होतो का ? सरकारला साकडं आहे, हिंदुची भावना लक्षात घ्यावी. त्यांनी खेळ करू नये"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.