
मुंबई - राज्यातील विकासकामात केंद्र सरकार अडथळे का आणतो, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. काल राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी कांजूरमार्गच्या मुद्द्याला हात घातला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. 'बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलात राज्याची हक्काची आणि मोक्याची जागा केंद्राला दिली. तसंच वाढवण बंदर प्रकल्पास विरोध असलेल्या स्थानिकांची समजूत काढत आहोत. मग, राज्याच्या विकासकामात केंद्र सरकार अडथळे का आणते, 'विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,' असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
विषय क्रेडिटचा नाही
विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा..
प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच!
म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश..
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 21, 2020
' विषय क्रेडिटचा नाही विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा.. प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच! म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश.. नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥ ' असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर ही प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपनेते आशिष शेलार यांच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
कांजूरमार्ग कारशेडचा सुरू असलेला वाद जनतेच्या हिताचा नाही. प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करू नये. हवं तर श्रेय तुम्हाला देतो. तुमची जागा आणि माझा जाग म्हणून प्रकल्पाची खेचाखेची करू नका, माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे की, बसून चर्चा करू. आणि प्रश्न सोडवू. कांजूरमार्गवर मेट्रो कारशेड होणं योग्य आहे. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगाल. असे मुख्यमंत्री म्हणाले,
कांजूरमार्गच्या मुद्द्यावरून मला अहंकारी म्हटलं जाते. होय मी अहंकारी आहे माझ्या मुंबई साठी माझ्या महाराष्ट्रासाठी आरेत मेट्रो तीनसाठी कारशेड करणार होतो. त्यासाठी 30 हेक्टर जागा घेतली जाणार होती. त्यातील पाच हेक्टर जागेवर झाडे असल्याने या जागेवरील झाडे कापणार नाही आणि ती वापरात घेणार नाही, असं आपण लिहून दिलं होतं. म्हणजे एकूण 25 हेक्टरवर कारशेड होणार होती. 2023मध्ये हे काम पूर्ण होणार होतं. त्यानंतर भविष्यात पुन्हा जागा कमी पडली असती तर झाडे कापणार होतो. झाडे कापून ती पाच हेक्टर जागा घेणार होतो. 2031 पर्यंत आणखी जागा कमी पडली असती तर आणखी घेणार होतो. एका लाईनसाठी जंगल मारत मारत जाणार होतो. त्यात एक मार्ग स्टब्लिंगसाठी करायचा होता. म्हणजे गाड्या पार्क करण्यासाठी जागा ठेवायची होती. पण या प्रस्तावात त्याचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे आमच्या सरकारने आरेच्या टोकावर जिथं कास्टिंग यार्ड आहे, तिथे स्टेब्लिंग लाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगतानाच आपण आरेचं पर्यावरण वाचवलं असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवून 800 एकर केली आहे. जगातलं हे शहरात असलेलं सर्वात मोठं जंगल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
BJP leader Ashish Shelar criticizes CM Kanjurmarg issue
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.