गणेश नाईक नाराज? सिडको घेराव आंदोलनाकडे फिरवली पाठ

राज ठाकरेंची वेगळी भूमिका असूनही मनसेचे आमदार राजू पाटील आंदोलनात सहभागी झाले....
Ganesh Naik
Ganesh Naik

नितीन संकपाळ

सानपाडा: दहा जूनच्या मानवी साखळी आंदोलनानंतर विमानतळ आंदोलनाचा दुसरा टप्पा सिडको (cidco) घेराव हा नवी मुंबई मनपा मुख्यालय समोर आज आयोजित केला होता. हजारो ग्रामस्थ या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने जनसागर उसळला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (navi mumbai airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब करावे या मागणीसाठी सिडकोला घेराव घालण्यासाठी ठाणे रायगड जिल्ह्यातील (raigad district) आगरी कोळी कऱ्हाडी,भंडारी,कुणबी,या समाजाच्या भूमिपुत्रांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. (Bjp leader ganesh naik not participated in cidco ghero protest)

आजच्या सिडको घेराव आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. पण तरीही मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे दि.बा.पाटील यांचे विमानतळाला नाव द्यावे, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपाच्या मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर ही सगळी नेतेमंडळी आंदोलनात सहभागी झाली होती. पण गणेश नाईक आंदोलनात कुठेही दिसेल नाहीत. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. गणेश नाईक हे नवी मुंबईतील एक मोठं प्रस्थ आहे. तिथेच हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, आणि आज गणेश नाईकच आंदोलनामध्ये नाहीत असे चित्र दिसले. गणेश नाईक यांची दोन्ही मुले संदीप आणि संजीव नाईक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Ganesh Naik
'उंदरांचा बंदोबस्त करणं शिवसेनेच्या वाघाला आता जमत नाही'

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ग्रामस्थांनी दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर या नामकरण मुद्द्याला राजकीय वळण लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा फिस्कटल्यावर भूमिपुत्र आंदोलनावर ठाम होते. अखेर हाती लाल पांढरा ध्वज हाती घेवून घोषणांच्या निनादात आंदोलनकर्ते नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पाम बीच मार्गावर सागर संगम रेल्वे स्थानक रेल्वे उड्डाणपुलाखाली जमा झाले. यावेळी उरण,पनवेल,अलिबाग,पेण,रोहा, माणगाव,ठाणे ग्रामीण भागातून हजारो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

Ganesh Naik
तुम्हाला AC लोकल का हवी? मध्य रेल्वेने सुरु केला सर्वे

नवी मुंबई शहरातील जवळपास सर्वच गावातील भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. व्यासपीठाच्या समोर महिला आंदोलकांनी वट पौर्णिमा साजरी करत दीं. बा.पाटील यांच्या नावाचे साकडे घातले.गायकांनी दि. बा.पाटील यांच्या स्मरणार्थ गीतांची मेजवानी सादर केल्याने आंदोलनात संगीतमय वातावरण तयार झाले होते.या आंदोलनात मनसेचे आमदार राजू पाटील,भाजपचे प्रशांत ठाकूर,आमदार मंदाताई म्हात्रे,महेश बालदी,माजी मंत्री रवींद्र चव्हाण,संदीप नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नेत्यांची हजेरी होती.मात्र माजी मंत्री ज्येष्ठ आमदार गणेश नाईक सदर ठिकाणी उपस्थित नसल्याने आंदोलकांमध्ये चर्चा आणि नाराजीचा सूर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com