राजीनामा दिला म्हणून मी अनिल देशमुखांना दोषी म्हणणार नाही- सुधीर मुनगंटीवार

sudhir.jpg
sudhir.jpg

"अनिल देशमुखांनी राजीनामा दिला, त्याच स्वागत केलं पाहिजे. हा महाराष्ट्राच्या नामुष्कीचा विषय होता, नाचक्की झाली" असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. "३२ वर्ष सेवा केलेल्या अधिकाऱ्याची गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने नियुक्ती केली. त्यांची वकिली केली. पण त्याच अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज गायब होतं हे योग्य नाही. महाराष्ट्राची नामुष्की वाचवण्यासाठी राजीनामा दिला असेल, तर त्यात काही वाईट नाही" असे मुनगंटीवार म्हणाले. 

"परमबीर सिंह दोषी  असतील, त्यांनी खोटं पत्र लिहिलं असेल,  तर सीबीआय चौकशीत खरा गुन्हेगारी पुढे येईल" असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. "गृहमंत्र्यांनी खरोखर खंडणी वसुली केली असेल, तर ती जगभरातील ऐतिहासिक, भ्रष्टाचाराची घोडचूक होईल" असे मुनगंटीवार म्हणाले.  "राजीनामा दिला यात जीत-हार हा विषय नाही. महाराष्ट्राची नाचक्की जगभर होऊ नये. मंत्र्याने राजीनामा दिला म्हणून तो शिक्षेस पात्र होत नाही." 

"परमबीर सिंहांनी खोटे आरोप केले असतील, तर ते शिक्षेस पात्र ठरतील. राजीनामा दिला म्हणून मी अनिल देशमुखांना दोषी म्हणणार नाही. काही गडबड असेल, तर दाल मे कुछ काला हैं" अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com