
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडणार आहे. जनसंपर्क विभागानं यासंदर्भातील पत्रकही जाहीर केलं आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल व्हायला लागले आहेत. फडणवीसांनी या नेत्यांना जेवणासाठी निमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे. पण या डिनर डिप्लोमसीत उद्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर खलबतं होणार आहेत. (BJP leaders reached at Devendra Fadnavis house discution will be ahead Cabinet expansion)
उद्याच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी जनसंपर्क कार्यालयानं माहिती देणारं पत्रक काढलं आहे. यात 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मंत्रिपदासाठीची संभाव्य नावं -
उद्या होणाऱ्या शपथविधीमध्ये भाजपमधून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, सदा सरवणकर आदींच्या नावाची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीला जाऊन आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर यावर आता शिक्कामोर्तब झालं असून, उद्या कोणकोणत्या मंत्र्यांचा शपथ विधी पार पडतो आणि कुणाला कुठलं खात्याची जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.