esakal | 'काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच'
sakal

बोलून बातमी शोधा

'काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच'

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत आशिष शेलारांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

'काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच'

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत आशिष शेलारांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कोकणात शिवसेनेचं वस्रहरण करणार असा निर्धार भाजपनं केला आहे. तसंच पैशाचा खेळ करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असंही शेलार म्हणालेत. 

शिवसेनेचा गड असलेल्या कोकणावर भाजपचं विशेष लक्ष आहे. आज मुंबईत भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ग्रामपंचायत, महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. तसंच या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 दरम्यान या पत्रकार परिषदेत शेलारांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुंबई सेंट्रलचे नाव नाना शंकरशेठे टर्मिनस होणार आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांनी क्रेडिट घेऊ नये, असं म्हणत शेलारांनी अरविंद सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

महाविकास आघाडीत सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नशिबी सकाळ, दुपार, संध्याकाळ लाथाच असल्याचं वक्तव्यही आशिष शेलारांनी केलं आहे. 

या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे उपस्थित होत्या. 

BJP MLA Ashish Shelar criticizes Shiv Sena Press conference arvind sawant

loading image