esakal | शेंबडे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले - नितेश राणे
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

शेंबडे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले - नितेश राणे

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: भाजपच्या (bjp) १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्याच्या मुद्यावर भाजपाचे कोकणातील आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी सडकून टीका केली आहे. सभागृहात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी या आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. "हे सोंगाड्यांच सरकार आहे. भास्कर जाधव यांची भूमिका ही नरकासूराप्रमाणे आहे. ही एकाच तालमीतली माकडं आहेत. माझ्या १२ सहकारी आमदारांनी कोणालाही, कोणतीही शिवीगाळ केलेली नाही. मुख्यमंत्र्यांसकट सगळेच घाबरलेत. म्हणून त्यांनी मिळून रचलेलं हे नाटक (drama) आहे" असा आरोप नितेश राणे यांनी केला. (Bjp Mla from kokan & son of narayan rane nitesh slam thackeray govt over suspension of 12 bjp mlas)

"माझे १२ सहकारी ओबीसी आणि मराठा समाजाठी लढले आहेत. महाराष्ट्रासाठी कोणी लढत असेल तर त्याचा सार्थ अभिमान आहे" असे नितेश राणे म्हणाले. आजचा अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे, त्या बद्दल काय रणनीती असेल, या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले की, "रणनीती ठरेलच. पण आम्ही लढतच राहणार. हे शेंबडयासारखे आहेत, म्हणून १२ आमदार निलंबित केले."

हेही वाचा: Vaccination: अर्ध्या मुंबईचा घेऊन झालाय पहिला डोस; BMCचा दावा

नितेश राणे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळे बारा आमदारांवर कारवाई झाली असे म्हणाले. "ते स्वत: आणि त्यांचा मुलगा आदित्य सोडला, तर कोणीही त्यांना मतदान करणार नाही. अनिल परबही मतदान करणार नाही. डरपोक माणसाला राज्याचा मुख्यमंत्री बनवलं तर राज्याची हीच हालत होणार" अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

loading image