जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज

जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज कारच्या फुटलेल्या काचेचा फोटो ट्वीट करत ठाकरे सरकारला आव्हान BJP MLA Gopichand Padalkar Car Glass Broken Nilesh Rane Challenge CM Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Ministers
जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज

कारच्या फुटलेल्या काचेचा फोटो ट्वीट करत ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई: आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. मी शिक्षकाचा मुलगा आहे त्यामुळे कोणीही संस्कार शिकवू नये, असेही ते म्हणाले. त्यांनी बड्या नेत्यांवर केलेली टीका काही कार्यकर्त्यांना रूचली नाही. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. घोंगडी बैठकीसाठी ते सोलापुरात आले असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या कारची काच फुटली. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला एक आव्हान दिलं. (BJP MLA Gopichand Padalkar Car Glass Broken Nilesh Rane Challenge CM Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Ministers)

जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज
Coronavirus : वापरलेल्या लशींच्या कुप्या खरंच नष्ट झाल्या का?

"आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही", असं खुलं आव्हान निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला ट्वीटच्या माध्यमातून दिलं.

जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज
'अगली बार पथर नही कुछ और होगा',भाजपाच्या हाजी अरफात शेखना धमकी

नक्की काय घडलं?

गोपीचंद पडळकर यांनी काही बड्या नेत्यांवर टीका केली. त्या टीकेनंतर आमदार पडळकर यांच्या कारवर दगडफेक झाली. ही घटना समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी आमदार पडळकर यांच्याभोवती बंदोबस्त वाढवला असून दगडफेक नेमकी कोण केली किंवा कारची काच कोणत्या अन्य कारणामुळे फुटली आहे का? याचा तपास केला जातोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com