esakal | ड्रग्ज माफीया घरजावई लागतात? राम कदमांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल | Ram kadam
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-MLA-Ram-Kadam

ड्रग्ज माफीया घरजावई लागतात? राम कदमांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात NCB ने क्रूझवर केलेल्या छापेमारीच्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजपाचे घाटकोपरचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी यावरुन आता महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. "एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या साहसाने क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज आणि काही लोकांना रंगेहाथ पकडलं. संपूर्ण देशात त्यांचं कौतुक होत आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही सर्व कारवाई ढोंग आहे असं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा अपमान करत आहेत" असं राम कदम म्हणाले.

"जे अधिकारी ड्रग्ज माफीयावर कारवाई करतात ते ढोंगी, पण ड्रग्य माफीया चांगले. काय म्हणायच काय? महाराष्ट्र सरकारची मती कुठे गेलीये? ड्रग माफिया या तीन पक्षांच्या सरकाराचे कोण लागतात? रिया चक्रवर्तीच्यावेळी सुद्धा तिच्या व्हॉट्स अॅप चॅटवरील ड्रग्जशी संबंधित संभाषण ६६ दिवस का लपवलं? कोण लागतात हे ड्रग्ज माफीया? घरजावई आहेत का? असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

हेही वाचा: मनीष भानुशालीचा भाजपाशी काय संबंध? प्रवीण दरेकरांनी दिलं उत्तर

"जे अधिकारी कारवाई करतील, त्यांच्यावर तुम्ही तुटून पडणार, काय झालय तुम्हाला, महाराष्ट्र सरकारला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल. अप्रत्यक्षपणे ते ड्रग माफीयांचं समर्थन करत आहेत का? कोट्यवधी रुपयांची वसुली त्यांच्याकडूनही केली जाते का? या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील" असे राम कदम म्हणाले.

loading image
go to top