"शिवसेनेला कोकणी माणसाने खूप काही दिलं, पण..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

"आता कोकणी माणसाची सहनशीलता आता संपलेली आहे"

"शिवसेनेला कोकणी माणसाने खूप काही दिलं, पण..."

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: "शिवसेना कोकणी माणसाला विसरली आहे. शिवसेनेला (Shivsena) कोकणी माणसाने खूप दिलं, पण शिवसेनेकडून त्यांना कोणतीही मदत दिली जात नाही. केवळ दोन-तीन तासाच्या दौऱ्याने कोकणात (Konkan) झालेल्या नुकसानीची परिस्थिती समजू शकत नाही. कोकणी माणसाची सहनशीलता (Patience) संपलेली आहे. कायम केंद्रांकडूनच (Central Govt) मागणी मागितली जाते आणि राज्य सरकारचा (MVA Govt) हात मदत देण्यासाठी आखडता ठेवला जातो. केवळ घरात बसून राहायचं आणि दौऱ्याबाबत (Tour) बोलायचं ही म्हणजे एका अर्थाने दुर्घटनाग्रस्तांची थट्टा करण्यासारखंच आहे", अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांचा तीन दिवसीय कोकण दौरा संपल्यानंतर मुंबईत ते बोलत होते. (BJP Pravin Darekar says Konkan has given a lot to Shivsena but it is not repaid by CM Uddhav Thackeray)

"चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. शक्य तितक्या लवकर मदत मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. आम्ही तीन दिवसाचा दौरा केला तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी केवळ तीन तासाचा दौरा केला. कोकणी माणसाला अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामुळे पंचनामे जलद गतीने करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. सामान्यपणे नुकसानग्रस्तांचा आढावा कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. तात्काळ अशा वेळी मदत केली जाते. मात्र तसं न करता कोकणी माणसाच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. आहेत, असा आरोप त्यांनी केला.

"स्वत: हवाईप्रवास करून दोन-तीन तासाचा दौरा करायचा आणि दुसऱ्याच्या हवाई प्रवास दौऱ्याकडे बोटं दाखवायची, हे चुकीचं आहे. पंतप्रधान मोदी गुजरातला मदत करत असताना महाराष्ट्राकडे आले नाहीत आणि त्यांनी मदत केली नाही, अशी ओरड सध्या सुरू आहे. या सगळ्यांना मी सांगतो की गोवा, कर्नाटक, राजस्थान येथेही नुकसान झालंच आहे. पण तिथे तशी ओरड नाही. त्याचे कारण गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची अवस्था त्याहून जास्त बिकट होती", अशा शब्दात दरेकर यांनी मोदींच्या 'केवळ गुजरात' दौऱ्याचे समर्थन केले.

loading image
go to top