भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पाली : माजी मंत्री व पेण- सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे संभाव्य उमेदवार रवींद्र पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्‍यात व पालीमध्ये मोठमोठे शुभेच्छा फलक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावले होते. या फलकांवर तालुक्‍यातील भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो आहेत; मात्र भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस व पेण, सुधागड, रोहा विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील यांचा फोटो वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे सुधागड भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची विष्णू पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांचा फोटो फलकावरून वगळल्याचे बोलले जात आहे. याबाबत भाजप सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी सांगितले, की घडलेला प्रकार चुकीचा असून नियमानुसार विष्णू पाटील यांचा फोटो हवा होता. इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

याआधी पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्या वेळी त्यांना भरघोस मते मिळाली होती; मात्र त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा शिवसेना अशा विविध पक्षांचा प्रवास केला. सध्या ते भाजपमध्ये आहेत. लोकसभेला शिवसेना आणि भाजपची युती झाली होती; मात्र विधानसभेला ही युती कायम राहील की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत आहे. शुभेच्छा फलकावर माझा फोटो का नाही टाकला हे त्यांचे त्यांना माहीत! मी मात्र पक्ष देईल ती कामगिरी बजावण्यास तयार आहे.
- विष्णू पाटील, रायगड जिल्हा सरचिटणिस, भाजप 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is on the verge of collusion