बेस्टचे वेतन चिल्लरमध्ये नको; वेतन थेट बॅंकेत जमा करण्याची भाजपची मागणी

समीर सुर्वे
Friday, 15 January 2021

आजही बेस्टच्या कर्मचाऱ्याना रोखीने वेतन मिळत असून त्याच चिल्लरही दिली जाते.त्यामुळे हा प्रकार थांबवून वेतन थेट बॅंकेत जमा करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली आहे.

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बॅंकेत जमा करण्यासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाशी करार करण्यात आलेला आहे.मात्र,या कराराची अमंलबजावणी होत नाही.आजही बेस्टच्या कर्मचाऱ्याना रोखीने वेतन मिळत असून त्याच चिल्लरही दिली जाते.त्यामुळे हा प्रकार थांबवून वेतन थेट बॅंकेत जमा करण्यात यावे अशी मागणी भाजपने केली आहे.

कोविड काळात कर्मचाऱ्यांना रोखीने वेतन दिले जा आहे.यात नोटांसह पाच आणि दहा रुपयांची नाणी दिली जातात.11 हजार रुपयांच्या वर वेतन असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला अशा प्रकार वेतन दिले जाते.ही नाणी घरा पर्यंत घेऊन जाण्यात कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

बेस्ट कडे जमा होणारी नाणी हाताळण्यासाठी आयआयसीआय या बॅंकेची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र,तो करार संपला आहे.त्याच बरोबर कर्मचाऱ्याचे वेतन स्टेट बॅक ऑफ इंडिया मध्ये जमा करण्यासाठी करार झाला आहे.मात्र,आजही कर्मचाऱ्यांना रोखीने वेतन दिले जाते.याकडे बेस्ट समितीती भाजपचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी लक्ष वेधले आहे.प्रशासनाने तत्काळ कर्मचाऱ्याचे वेतन बॅंक खात्यात जमा करण्यास सुरवात करावी अशी मागणीही त्यांनी केली.

BJPs demand to deposit salary directly in the bank of Best employee in mumbai

----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs demand to deposit salary directly in the bank of Best employee in mumbai