esakal | BKC लसीकरण केंद्र पुन्हा बंद, केवळ 10 ते 12 डोस शिल्लक

बोलून बातमी शोधा

Corona vaccination
BKC लसीकरण केंद्र पुन्हा बंद, केवळ 10 ते 12 डोस शिल्लक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरण बंद झाले आहे. त्यात शहरातील बीकेसी लसीकरण केंद्राचाही समावेश आहे. लसींचा साठा संपल्याने मुंबईतील महत्त्वाची लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. यात बीकेसी लसीकरण केंद्राचा ही समावेश असून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागत आहे. बीकेसी लसीकरण केंद्र बंद असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सध्या मुंबईतील एकूण 19 लसीकरण केंद्र बंद झाली आहेत.

लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असताना लसींचा साठा संपल्याने मुंबईतील बीकेसी आणि दहिसर लसीकरण केंद्र बंद आहे.

हेही वाचा: रेमिडीसीवीर इंजेक्शन खासगी व्यक्तीला मिळतातच कसे?, हायकोर्टाचा सवाल

फक्त 10 ते 12 डोस शिल्लक

बीकेसी लसीकरण केंद्राकडे आता फक्त 10 ते 12 लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे, सकाळपासूनच लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून झालेली गर्दी 11 वाजता थोडी ओसरली. डॉक्टरांनी बाहेर येऊन नागरिकांना डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबवले असल्याचे केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले.

नेस्को केंद्राबाहेर ही मोठी रांग

दरम्यान गोरेगावच्या नेस्को लसीकरण केंद्रांबाहेरही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून लोकांनी मोठी रांग लावली आहे.

मुंबईत याठिकाणी लसीचा साठा संपला

ब्रीच कॅन्डी (कंबाला हिल)

खुबचंदानी (कुलाबा)

शुश्रुषा (विक्रोळी)

एशियन हार्ट (बीकेसी)

भाटिया (ताडदेव)

सैफी (चर्नी रोड)

बालाजी (भायखळा)

मसिना (भायखळा)

रहेजा (माहिम)

गुरुनानक (वांद्रे)

ग्लोबल (परळ)

राणे रूग्णालय (चेंबूर)

देसाई रुग्णालय (मालाड)

दळवी प्रसूतीगृह (कुर्ला)

वांद्रे पश्चिम स्थित होली फॅमिली रुग्णालय

वांद्रे पश्चिम स्थित होली फॅमिली रुग्णालय

चेंबूर स्थित झेन रुग्णालय

बीकेसी

दहिसर

नायर रुग्णालय

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bkc jumbo covid vaccination centre not active today bmc informed