सावित्री नदीवरच्या पुलाची 'ती' काळी रात्र; 2016 मधील दुर्घटनेच्या आठवणी आजही स्मरणात...

सावित्री नदीवरच्या पुलाची 'ती' काळी रात्र; 2016 मधील दुर्घटनेच्या आठवणी आजही स्मरणात...

महाड ः

2 ऑगस्टची ती अमावस्येची काळोखी रात्र... कधी नव्हते एवढे पावसाचे तांडव. अशा परिस्थितीत सावित्री आणि काळ नदी जणू काळाचे रुप घेऊन धोक्याच्या बाहेर वाहत होत्या. रात्री साडेअकरा वाजता पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि पाहता पाहता सावित्री नदीवरील जूना पूल भूईसपाट झाला. या पूलासोबत अनेकांना जलसमाधी मिळाली. क्षणात अनेकांचे संसारही उदध्वस्त झाले.

आता सावित्रीच्या नव्या पूलावरुन वाहने धावत आहेत. आणखी एक पूल उभा राहत आहे. मात्र, त्या दिवशीच्या कटू आठवणी आजही अनेकांच्या ताज्या आहेत.  नदीतून काढलेले बसचा सांगाडाही महाड आगारात सडत आहे. 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. आजही ही घटना आणि त्यानंतरचे शोध कार्य अंगावर रोमांच उभे करते. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर- बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा यासह 40 जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले. बसंतकुमार या वर्कशाप मधील कामगाराने पूल कोसळतांना पाहिल्यानंतर त्याने येथे अनेक वाहने थांबवल्यांने पुढील अनर्थ टळला. वाहने व मृतदेह शोधण्याचे काम तब्बल 15 दिवस सुरु होते. नेव्ही, कोस्टल, एनडिआरएफ, स्थानिक पोलिस, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत होती. पूल वाहून गेला पण माणूसकीचे अनेक पूल येथे उभे राहिले. सामाजिक संस्थांनी अन्नधान्य पाणी पुरववे.

महाड एमआयडीसीतील सीईटिपीने या काळात खूप मदत केली. सीईटिपीचे अधिकारी निखील भोसले त्या घटनेच्या अठवणींनी गहिवरले. सीईटिपीने कर्तव्य भावनेतून मदत कार्य केले. पण असा प्रसंग कधी येऊ नये असे ते म्हणाले. तर व्यापारी विनोद वाकलकर यांनी ते दृश्य आठवले तरी अंगावर काटा येतो.होडीतून सुरु असलेली मदत, सापडणारे मृतदेह, यात आपले कुणी आहे का हे पाहण्यासाठी नातेवाईकांची अगतिकता आजही विसरता येत नसल्याचे सांगितले. मदत कार्यात नऊ मृतदेहांचा तपास अखेर पर्यंत लागलाच नाही.अखेर दोन बस शोधकार्यात बाहेर काढल्या गेल्या. यातही मृतदेह न सापडल्याने नातेवाईकांच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या. 

180 दिवसांत नवीन पूल
सावित्री नदी पूल  दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळ व शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली. महामार्ग विभागाने 180 दिवसात येथे नवीन पूल उभारला. दुस-या पूल उभारण्याचे कामही सुरु आहे. परंतु उभे राहिलेले अनेकांचे संसार मात्र कायमचे ढासळले.

------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com