Block at Thane-Mulund | ठाणे आणि मुलुंडदरम्यान कोपरी उन्नत पुलाचे गर्डर टाकण्याचे काम

कुलदीप घायवट
Thursday, 21 January 2021

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि मुलुंड दरम्यान कोपरी उन्नत पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. 

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि मुलुंड दरम्यान कोपरी उन्नत पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. यानिमित्ताने  रविवारी, सोमवारी मध्य रात्री विशेष ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ठाणे ते मुलुंड दरम्यान रेल्वेच्या सहाही मार्गांवर असणार आहे. त्यामुळे अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे तर काही रेल्वे गाड्यांना शॉर्ट टर्मिनल करण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक रविवारी (ता.24) आणि सोमवारी (ता.25) रोजी मध्य रात्री 1 वाजेपासून ते पहाटे 4.30  वाजेपर्यंत असणार आहे.  त्यामुळे 07058 सिकंदराबाद-मुंबई स्पेशल एक्स्प्रेस, 07317 हुबळी-एलटीटी स्पेशल एक्स्प्रेस, 07057 मुंबई-सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेस, आणि 07318 एलटीटी-हुबळी स्पेशल एक्स्प्रेस 23 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहे. तर  02116 सोलापूर-मुंबई स्पेशल एक्स्प्रेस, पुण्यात शॉर्ट टर्मिनल करण्यात येणार आहे. तर 01112 मडगाव-मुंबई विशेष एक्स्प्रेस 23 जानेवारी 2021 आणि 24 जानेवारी 2021 रोजी  पनवेल रेल्वे स्थानकांतून सोडण्यात येणार आहे. 

मुंबई, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कुठे - ठाणे ते मुलुंड 
कधी - रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत
परिणाम - रात्री 12.30 ते पहाटे 5.30 पर्यंत कुर्ला ते ठाणे लोकल सेवा बंद

Block at Thane Mulund railway line Laying of girder kopari elevated bridge 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Block at Thane Mulund railway line Laying of girder kopari elevated bridge