Mumbai : रक्ताच्या तुटवड्यावर विद्यार्थ्यांचा तोडगा; गणेशोत्सवात केले रक्तदान

blood donation
blood donationsakal media
Updated on

मुंबई : मुंबईत भासत असलेल्या रक्ताच्या तीव्र तुटवड्यावर (blood shortage) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तोडगा (students solution) काढला आहे. जेजे रुग्णालयातील (JJ hospital) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवादरम्यान (Ganpati festival) रक्तदान (Blood donation) करण्याचा निर्णय घेतला.

blood donation
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ४४६ नव्या रुग्णांची नोंद; २ जणांचा मृत्यू

कोरोना महामारीत सध्या मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा भासू लागला आहे. पण, विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा बजावत रक्तदान ही केले. मुंबईच्या जेजे रुग्णालयात जवळपास 32 हून अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, डॉ. श्रीनिवास चव्हाण, डाॅ संतोष गिते, डाॅ सुमित लहाने, डाॅ सुजाता यांच्या मार्गदर्शनाखाली जेजेतील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी कोविडचे सर्व नियम पाळुन केला गणेशोत्सव साजरा. पहिल्यांदाच मुलांनी हाॅस्टेलवर रक्तदान शिबीर आयोजित केले.

32 रक्त पिशव्यांचे संकलन झाले.  रक्तदान शिबीराचे उद्घाटन पद्मश्री तात्याराव लहाने यांनी केले, उद्घाटनाच्या वेळी बोलताना विद्यार्थ्यांना रक्तदानाचे आणि गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व सांगितले, प्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षातून किमान दोनदा रक्तदान करण्याचे आश्वासन दिले. रांगोळी स्पर्धेत आणि रक्तदान शिबीरात मुलामुलींचा उत्साह दिसून आला. पण, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक मुलींना रक्तदान करता आले नाही. अनेक वर्षांच्या शिबिरांपेक्षा यावर्षी भरभरुन प्रतिसाद मिळाला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात शैलेश भुतनर आणि प्रितम राऊतवाड यांनी मेहनत घेतली, पोस्टर स्पर्धेत कोविड वाॅरीयर हा विषय होता,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com