वसई शिवसेनेत खळबळ, १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

हे राजीनामे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे दिले आहेत.
वसई शिवसेनेत खळबळ, १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक  राजीनामे

विरार: वसई तालुक्यात शिवसेनेमध्ये (vasai shivsena) एका बाजूला इनकमिंग सुरु होत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला करण्यात येत असल्याने वसईच्या पूर्वपट्टीतील 150 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. काल हे राजीनामे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक (Ravindra phatak) आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याकडे दिले आहेत.

वसई तालुक्यातील शिवसेनेमध्ये इतर पक्षात नाराज असलेले येण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरु झाली आहे. पक्षाच्या आढावा बैठका आणि निर्णय प्रक्रियेतून लांब ठेवले जात असून इतर पक्षातून आलेल्याना जवळ केले जात असल्याचे कारण देत वसई पूर्वेमधील गोखिवरे,सातिवली, वालिव ,गावराईपाडा ,संतोष भुवन या पाच विभागातील सेनेच्या 150 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रवीन्द्र फाटक यांच्याकडे दिल्याने खळबळ उडाली आहे.

सेनेत कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात असून दुसऱ्या पक्षातून आलेल्याना पायघडया घातल्या जात आहेत असा आरोप शिवसैनिक करू लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात इतर पक्षातील नेते सेनेत येत असताना सामान्य शिवसैनिक नाराज होणार नाही याची हि काळजी आता सेना नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची श्यक्यता वर्तविण्यात येत आहे.

वसई शिवसेनेत खळबळ, १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक  राजीनामे
अलिबागमध्ये D-Mart संस्थापकांचं घरकुल; किंमत वाचून विस्फारतील डोळे!

सामूहिक राजीनामा दिलेल्या मध्ये बोईसर विधान सभा समन्वयक अजित भोईर, उपतालुका प्रमुख काकासाहेब मोटे , विभाग प्रमुख शरद गावकर, युवा सेनेचे धनंजय मोहिते यांच्या सह शिवसेनेच्या पडत्या काळात ही सेना वाढविण्यासाठी आणि ती टिकविण्याचे काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पूर्वपट्टीत खळबळ उडाली आहे.

वसई शिवसेनेत खळबळ, १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक  राजीनामे
एका महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याची पवारांवर वेळ- चंद्रकांत पाटील

याबाबत राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न छपण्याच्या अटीवर सांगितले कि, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्हाला पदापेक्षा ओळख आहे ती शिवसैनिक म्हणून. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसैनिक म्हणून आम्ही कायम आहोत. सत्ता आल्यावर पक्षासाठी खस्ता खालेल्याला शिवसैनिकांना लांब केले जात आहे. तर इतर पक्षातून आलेल्याना मात्र पायघड्या घातल्या जात आहेत" असे सांगून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

"शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे हे गैरसमजातून दिले आहेत. हे एका घरातील गैरसमज आहेत ते मिटविण्यात येणार असून , पुन्हा एकदा त्या ठिकाणी सेना जोमाने काम करतील" - निलेश तेंडुलकर, तालुका प्रमुख शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com